महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांची फौज असलेला 'चिकी चिकी बुबूम बूम' या मराठी कॉमेडी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं कलाकारांकडून जोरदार प्रमोशन होत आहे. 'चिकी चिकी बुबूम बूम'मधील कलाकार नुकतंच सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले.
'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमातील प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित माने, प्रथमेश शिवलकर हे सिनेमातील कलाकारही उपस्थित होते. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'चिकी चिकी बुबूम बूम'मधील कलाकार सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना दिसत आहे.
'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमा येत्या २८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, स्वप्निल जोशी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलं आहे.