Chiki Chiki Buboom Boom Movie Trailer: नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' (Chiki Chiki Booboom Boom) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बूम' या चित्रपटात मराठी कलाकारांची तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे विनोदवीर आता रुपेरी पडद्यावर एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहेत.
शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच एक मजेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टिझरवरुन चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात कलाकारांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. "पोट दुखेल, पण मजा थांबणार नाही!" अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे. धमाल मस्तीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांसाठी एक वेगळीच ट्रीट असणार आहे. चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.