Join us

मित्रांची रियुनिअन अन्...; 'चिकी चिकी बुबूम बुम'चा धमाका अमेरिकेत, 'या' दिवशी होणार प्रदर्शित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:27 IST

'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Chiki Chiki Buboom Boom Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने आता दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. अलिकडेच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' (Chiki Chiki Booboom Boom) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रार्थना बेहेरे (prarthana behre), प्राजक्ता  माळी(Prajakata Mali) , प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशा कलाकारांची तगडी फळी चित्रपटात पाहायला मिळतेय. 

'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतीच या चित्रपटाच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. मित्रांच्या धमाकेदार रियुनिअनची कथा आता अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. येत्या ८ आणि ९ मार्चला हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. 

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.  

टॅग्स :स्वप्निल जोशीप्राजक्ता माळीप्रार्थना बेहरेमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया