Join us

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'लाडू'ची थेट चित्रपटात एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 2:30 PM

'तुझ्यात जीव रंगला' (tuzyat jeev rangla) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. उत्तम कथानकासह मालिकेतील प्रत्येक कलाकाराने ...

'तुझ्यात जीव रंगला' (tuzyat jeev rangla) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. उत्तम कथानकासह मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यातलाच एक बालकलाकार म्हणजे लाडू.  राजवीरसिंह राजे गायकवाड ( rajveer singh gaikwad) या बालकलाकाराने या मालिकेत लाडू ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतरही तो प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. इतकंच नाही तर त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरही आहेत. यामध्येच आता लाडूने थेट चित्रपटात एन्ट्री मारली आहे. 

येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'भारत माझा देश आहे' या चित्रपटात लाडूची म्हणजेच राजवीरसिंहची वर्णी लागली आहे. या चित्रपटात युद्ध भूमीवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या कथा उलगडली जाणार आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने लाडू पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्येही असल्याचं पाहायला मिळतं.

"या चित्रपटात या दोन्ही बालकराकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याच्या प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा असा आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट असून यात एका बकरीचीही प्रमुख भूमिका आहे. ती कशी हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच,’’असं दिग्दर्शक म्हणाले.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती लष्करात आहे. टिव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल, भीती यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच बालकलाकार राजवीरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन चिमुकले चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक पांडुरंग जाधव करत आहेत. तर निर्मिती एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल हे करत आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारसिनेमाटेलिव्हिजन