आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रत्येक कलाकार जीव तोडून मेहनत करत असतो. त्यामुळे एखादा स्टंट असो, अॅक्शन सीन असो वा जीव धोक्यात घालणारा कोणताही सीन असतो ही कलाकार मंडळी जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे तो सीन करतात. विशेष म्हणजे आजपर्यंत असे सीन करताना केवळ अभिनेत्यांना पाहण्यात आलं आहे. मात्र, खुर्ची (Khurchi) या सिनेमामध्ये चक्क एका बालकलाकाराने असे काही सीन दिले आहेत. गंभीर दुखापत झालेली असतानाही आर्यन हगवणे (aryan hagawane) या बालकलाकाराने सिनेमाचं शुटिंग कुठेही न थांबता त्याचा सीन पूर्ण केला. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खुर्ची या आगामी सिनेमा राकेश बापट, अक्षय वाघमारे या कलाकारांसोबत आर्यन हगवणे या बालकलाकारानेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी या चिमुकल्याने त्याला झालेल्या दुखापतीकडेही दुर्लक्ष केलं.
खुर्ची या सिनेमात एका आर्यनने एका रागीट पण धाडसी अशा मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्याला या सिनेमात काही अॅक्शन सीनही करावे लागले आहेत. यामध्येच एका सीनचं शुटिंग सुरु असताना त्याला दुखापत झाली. एका सीनमध्ये आर्यनला दुखापत होऊन त्याचा रक्तस्त्राव होत असल्याचं दाखवायचं होतं. हा सीन करण्यात आर्यन इतका गुंग झाला की त्याला खरोखर लागलं आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही.
सीन शूट होत असताना आर्यनच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. ज्यामुळे त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. पण, चेहऱ्यावर कुठेही त्याची जाणीव न होऊ देता त्याने हा सीन पूर्ण केला. दरम्यान, त्यांचं हे अभिनय कौशल्य पाहून सेटवर सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं.
"आर्यनचं खूप कौतुक करावं लागेल. आर्यनने शूट केलेला हा सीन वनटेक सीन होता. हा सीन शूट करताना तो ठेच लागून खाली पडला. त्याला दुखापतही झाली. पण, तरी तो उठला आणि पुन्हा त्याच कॅरेक्टरमध्ये घुसला. तो लहान असूनही त्याला सीनची चांगली समज आहे, असं अक्षय वाघमारे म्हणाला.
Video: राकेश अन् अक्षयचा डॅशिंग अंदाज; 'खुर्ची'चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
दरम्यान, 'खुर्ची' या सिनेमाचं दिग्दर्शन शिव धर्मराज माने, संतोष कुसुम हगवणे यांनी केलं आहे. तर निर्मिती, पटकथा, संवाद यांची जबाबदारी संतोष कुसुम हगवणे यांनी पार पाडली. हा सिनेमा येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.