प्रार्थनाने बेहरेने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यामुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या ती संपर्कात असते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांनाही उत्सुकता असते. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांसह खास असतो. सोशल मीडियावर प्रार्थना बेहरेचा लहानपणीचा फोटो व्हायरल झाला आहे.
फोटोत दिसणारी चिमुरडी कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण तिचा चेहरा पाहून तिला तुम्ही ओळखलंच असणार नाही का ? चिमुकल्या प्रार्थनाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.आजच्या पीढीची नायिका म्हणून प्रार्थनाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा हा बालपणीचा फोटो तुम्हाला नक्कीच आवडेल. आज चित्रपटसृष्टीतील प्रमुख नायिकांमध्ये गणना होते.
प्रार्थनाने अभिषेक जावकरसह लग्न केले आहे. प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. अभिषेक आणि प्रार्थना यांचे हे अरेंज्ड मॅरेज होते. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. प्रार्थना आणि अभिषेकमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते.
लग्न अरेंज झाले असले तरीही रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.