Join us

चिन्मय का होता सोशल मीडियापासून अलिप्त ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2016 3:39 PM

सध्या सोशल मीडियाची चलती आहे. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या छोटया मोठया गोष्टी सोशल मीडियावर अपडेट करताना पाहायला मिळत असतात. ...

सध्या सोशल मीडियाची चलती आहे. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या छोटया मोठया गोष्टी सोशल मीडियावर अपडेट करताना पाहायला मिळत असतात. कलाकारदेखील चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करतात. मात्र याच सोशल मीडियापासून अभिनेता चिन्मय मांडलेकर हा काहीसा नाराज असल्याचे दिसत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडिया हे त्याच्यासाठी फालतूचे माध्यम वाटत असल्याचे सांगितले आहे. चिन्मय आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे यात चिन्मय लिहितो, सोशल मिडिया वर लिहीणे किंवा प्रतिक्रिया व्यक्त करणे हे फालतू मन:स्तापाचं साधन होऊ लागल्यापासून गेले अनेक महिने या माध्यमापासून अलिप्त होतो. पण आज पुन्हा पेपर उघडला आणखी दोन जवान शहीद झाल्याची बातमी वाचली. एक आपल्याच कोल्हापूरचा! आता पुन्हा यावरून राजकारण माजेल. स्वघोषित देशभक्त दंड थोपटतील, उदारमतवादी गळा काढतील! काही वर्षांनी आम्हाला फक्त फवाद खान लक्षात राहील आणि तुपारे आडनावाचा दोन मुलांचा तरुण बाप सीमेवर बळी गेला हे विसरून आम्ही कँडल मार्च काढू! त्याची ही पोस्ट वाचून त्याच्या चाहत्यांनीदेखील त्याच्या विचारांना दुजारा दिला आहे. तसेच त्याच्या या पोस्टला भरभरून लाइक्सदेखील मिळताना दिसत आहे. तू तिथे मी या मालिकेतून अभिनेता चिन्मय मांडलेकर याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच सध्या तो तू माझा सांगती या मालिकेतून पाहायला मिळत आहे. चिन्मय हा मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याच्याजवळ असलेल्या अनेक कलागुणांनी ओळखला जातो.