चौर्यचे दिग्दर्शक समीर आशा पाटीलचा नवा चित्रपट फुर्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 11:05 AM
समीर आशा पाटील यांनी चौर्य या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटातील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. ...
समीर आशा पाटील यांनी चौर्य या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटातील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. या पहिल्याच चित्रपटाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले. या चित्रपटाला अनेक फेस्टिव्हलमध्ये गौरवण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनीदेखील कौतुक केले आहे. या चित्रपटाचा विषय देखील खूपच वेगळा होता. त्यामुळे समीर आशा पाटील यांच्या पुढील चित्रपटांकडून देखील प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. समीर आशा पाटील इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अॅड फिल्मसाठी साहाय्यक दिग्दर्शकाचे काम करत होते. चौर्य या चित्रपटाची कथा देखील त्यांचीच आहे. या कथेवर चांगला चित्रपट बनू शकतो असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी अनेक निर्मात्यांची भेट घेतली होती. पण सुरुवातीला कोणीच या चित्रपटाची निर्मिती करायला तयार नव्हते. पण त्यांनी पैसे गोळा करून चित्रपचटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. पण काहीच दिवसांत त्यांनी जमवलेला पैसा संपला आणि त्यांना काही दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला. पण नंतर निलेश नवलखा यांनी चित्रपटाची कथा ऐकून आणि चित्रीकरणाचे रशेस पाहून या चित्रपटाची निर्मिती करण्यास होकार दिला आणि हा चित्रपट बनवला गेला.चौर्य या चित्रपटाच्या यशानंतर फुर्र हा चित्रपट घेऊन समीर येणार आहेत. या चित्रपटाची कथा मेहूल अगजा यांनी लिहिली असून कुशल अनिरुद्ध सिंग या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाची घोषणा समीर यांनीच त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवरून केली आहे. एफरॉन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन प्रस्तुत फुर्र हा चित्रपट देखील आगळ्या वेगळ्या विषयावर बेतलेला असणार असे म्हटले जात आहे.