ऑस्कर नामांकनासाठी 'कोर्ट'ची निवड योग्य - इरफान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:18 AM
इरफान खानच्या दोन चित्रपटांची गेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्य़ातील विदेशी चित्रपटांच्या विभागातील स्पर्धेसाठी निवड होईल अश्ी ...
इरफान खानच्या दोन चित्रपटांची गेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्य़ातील विदेशी चित्रपटांच्या विभागातील स्पर्धेसाठी निवड होईल अश्ी चर्चा होती. पण, ती झाली नव्हती. आता मात्र या अभिनेत्यानं चैतन्य ताम्हाणेच्या 'कोर्ट' या चित्रपटाची भारताकडून 'ऑस्कर'च्या स्पर्धेसाठीची यंदाची निवड ही आधीच्या काही लाजिरवाण्या निवडींच्या तुलनेत चांगली असल्याचे म्हटले आहे. इरफाननं 'कोर्ट'ची स्तुती करताना म्हटलं, की 'कोर्ट' हा चांगला चित्रपट आहे. मला त्याच्या स्पर्धेत असलेल्या इतर चित्रपटांविषयी ठाऊक नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी जे चित्रपट आपल्याकडून ऑस्करसाठी गेले होते, ती निवड निश्चितच लाजिरवाणी होती.इरफानचे 'पान सिंग तोमर' व 'द लंच बॉक्स' हे चित्रपट ऑस्कर सोहळ्य़ासाठी भारताकडून निवडले जाणार्या चित्रपटांच्या स्पर्धेत होते. परंतु त्यावेळी 'बर्फी' आणि 'द गुड रोड' यांची निवड फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने केली होती. ांतरराष्ट्रीय व्यासपीठावरील स्पर्धेसाठी भारतीय चित्रपटांची निवड करताना अतिशय गांभीर्यानं व तारतम्यानं विचार करून निर्णय घेणारी समिती असावी, अशी अपेक्षा इरफाननं व्यक्त केली आहे.