निवडुंग चित्रपट आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 10:38 AM
मुनावर भगत दिग्दर्शित निवडुंग या चित्रपटाची कथा आजच्या तरूणाची आहे. निसगार्ने निर्माण केलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत स्वत: प्रारब्ध बदलू ...
मुनावर भगत दिग्दर्शित निवडुंग या चित्रपटाची कथा आजच्या तरूणाची आहे. निसगार्ने निर्माण केलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत स्वत: प्रारब्ध बदलू पाहणारा धाडसी तरूण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दुष्काळासारखा कोरडा विषय हाताळताना मुनावर भगत यांनी त्याला प्रेमाच्या गुलाबी रंगाची किनार जोडली आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनासोबत मुनावर भगत यांनीच निवडुंगची कथा लिहिली असून महेंद्रपाटील यांनी पटकथा-संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात भूषणने एक असा नायक साकारला आहे, जो आजवर कधीही समोर आलेला नाही. संस्कृतीनेही आपल्या अभिनय तसंच नृत्य कौशल्याच्या बळावर आपली भूमिका यशस्वीरीत्या साकारली आहे. या चित्रपटात वेगवेगळया मूडमधील एकूण सहा गाणी असून सर्व गाणी चित्रपटाच्या कथानकाला गती प्रदान करणारी तसंच एकरूप होणारी आहेत. संगीतकार रफीक शेख यांनी संगीतबद्ध केली आहेत. झहीर कलाम, प्रसाद कुलकर्णी, कवी शरद यांनी या चित्रपटातील गीतरचना लिहिल्या आहेत. १४ आॅक्टोबर रोजी निवडुंग संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.