मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. नुकतीच लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे (shivani surve) आणि अजिंक्य ननावरे (ajinkya nanavre) या जोडीने लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये या जोडीची चर्चा आहे. यामध्येच दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) आणि प्रिया बेर्डे (priya berde) यांची लेक स्वानंदी (Swanandi Berde) हिने तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर लग्नाचं ठिकाण, कार्यक्रम कोणते असतील हे सुद्धा आधीच ठरल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे आता स्वानंदी खरोखरच लग्न करते का? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे.
नुकतंच स्वानंदीने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन घेतलं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. विशेष म्हणजे यात एका चाहत्याने तिला थेट तिच्या लग्नाचा प्लॅन विचारला. स्वानंदीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देत तिच्या प्लॅन सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाली स्वानंदी?
"मॅडम, तुम्ही कोणत्या वर्षी लग्नबंधनात अडकण्याचा विचार करत आहात?", असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. त्यावर, "स्थळ, कार्यक्रम, कपडे हे सगळं काही माझ्या डोक्यात ठरलेलं आहे. फक्त आता..", असं उत्तर स्वानंदीने दिलं. थोडक्यात लग्नासाठी स्वानंदी तयार आहे. मात्र, ती तिच्या होणाऱ्या नवरदेवाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येतं.
दरम्यान, स्वानंदीने हे उत्तर सहज म्हणून दिल्याचं या पोस्टवरुन लक्षात येतं. थोडक्यात, अद्यापतरी तिचे लग्नाचे काहीही प्लॅन नसल्याचं तिने यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्वानंदी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड आहे. 'रिस्पेक्ट' या सिनेमातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. तसंच 'धनंजय माने इथेच राहतात' या नाटकातही तिने काम केलं आहे.