'संगीत मानापमान' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा काल पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लाँचला सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. तेव्हा शंकर महादेवन आणि सुबोध भावे यांनी फडणवीसांना गाण्याचा आग्रह करताच काय घडलं बघा
गाणं गाण्याची विनंती करताच फडणवीसांंचं मजेशीर उत्तर
सुबोध भावे ट्रेलर लाँचच्या वेळी म्हणाला की, "देवेंद्र फडणवीसही उत्तम गातात". असं म्हणत सुबोध भावे मुख्यमंत्री फडणवीसांकडे माइक द्यायला जातो. शंकर महादेवनही 'वंदन हो' गाण्याच्या ओळी म्हणत फडणवीसांना आग्रह करतात. तेव्हा फडणवीस म्हणाले की, "पहिल्यांदा मी स्पष्ट करु इच्छितो की शब्दात सूर आहे पण सूरात असूर आहे. लोकांचं थोडं कन्फ्यूजन आहे की, माझी बायको गाते पण मी गात नाही." शेवटी गणपती बाप्पा मोरया म्हणत फडणवीस माइक सुपुर्त करतात.
संगीत मानापमानचा ट्रेलर लाँच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
काल मुंबईत 'संगीत मानापमान' सिनेमाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आणि टीम म्हणजेच सुबोध भावे, सुमीत राघवन, वैदेही परशुरामी, बेला शेंडे, शंकर महादेवन, आर्या आंबेकर हे कलाकार उपस्थित होते. 'संगीत मानापमान' सिनेमा १० जानेवारी २०२४ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.