Join us  

Confirm: मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर 'हि'च्यासोबत अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 7:23 AM

'रेगे' सिनेमाच्या यशानंतर अल्पावधीतच आरोह वेलणकर रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.आरोहने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर ...

'रेगे' सिनेमाच्या यशानंतर अल्पावधीतच आरोह वेलणकर रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.आरोहने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कॅप्शन टाकली आहे.ज्यामुळे अनेक मुलींचं जणूकाही हार्टब्रेकच झालं असावं. 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर आता लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे.आरोहने त्याच्या फेसबुक पेजवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा त्याचा एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे.शेअर केलेल्या फोटोला आरोहने रोमँटीक अशी कॅप्शनही दिली आहे.आरोहची खास मैत्रिण अंकिता शिंगवीसह तो लग्गबंधनात अडकणार आहे.  पुण्यात असताना दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.कॉलेजमध्ये असताना दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांत पुढे प्रेमात झाले.त्यामुळे आता ब-याच वर्षाच्या नात्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेकांसाठी आरोहची ही बातमी खुशखबर ठरली असवी.मात्र  अनेक तरुणींची मनं या पोस्टमुळे दुखावली गेली असणार. कारण या तरुणींमध्ये आरोह लाडका आहे.येत्या 11 डिसेंबरला हा विवाहसोहळा महाबळेश्वर येथे पार पडणार आहे.विशेष म्हणजे  हा विवाहसोहळा टेक्नोसॅव्ही असणार असे म्हटले जात आहे.टेक्नोसॅव्ही ऐकताच तुम्हाला प्रश्न पडला असणार,आता पर्यंत थीम वेडींग, ट्रेडिशनल, इंडो-वेस्टर्न वेडींग ऐकलंय तर टेक्नोसॅव्ही वेडींग नेमकं काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.तर टेक्नोसॅव्ही वेडींग म्हणजे आरोहने ‘आरोह वेड्स अंकिता’हे एक अॅप लाँच केले आहे.त्यात त्याच्या लग्नाबद्दल सर्व माहिती या अॅपद्वारे पाहुण्यांना कळणार आहे.सर्व नियोजन स्मार्ट अॅप पद्धतीने होणार आहे.त्यामुळे अनेक वैशिष्ट्यांनी परिपणूर्ण असलेला हा विवाहसोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.सध्या मराठी इंडस्ट्रीतह एका पाठोपाठ होणा-या लग्नांमुळे आता आरोहच्या लग्नाचीही उत्सकुता असल्याचे पाहायला मिळत आहे.Also Read:मराठी चित्रपटसृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOScnxoldfiles/a>  हा मराठी सिनेमा  २९ डिसेंबर २०१७ला सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे,  विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे या लग्नाआधी रिलीज होणा-या सिनेमामुळे आरोह आनंदात आहे. 'हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते.ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अजय नाईक यांनी काढले.ते पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.