'अनुबंध' लघुपटात भाव-भावनांची सुंदर गुंफण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 08:19 PM2019-04-19T20:19:52+5:302019-04-19T20:20:18+5:30
उन्नती गाङगीळ यांच्या पितृस्त्रोत या कथेवर आधारित अनुबंध या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे.
अनाथ असण हे पाप आहे का? कोणा एखाद्याने केलेल्या पापाची शिक्षा त्या बाळाला का भोगावी लागते. त्याच्या नशिबी काय लिहून ठेवले असेल ते त्या विधात्याला माहिती. त्याच विधात्याने असाच एक देवदूता सारखा भला माणूस पाठविला तर, असाच आशय असलेला उन्नती गाङगीळ यांच्या पितृस्त्रोत या कथेवर आधारित अनुबंध या शॉर्ट फिल्मची निर्मिती झाली आहे.
माका प्रोडक्शनच्या बॅनरखाली संजय पैठणकर यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. या अनुबंधचे लेखन स्वत: लेखिका उन्नती गाङगीळ यांनी केले आहे. या शॉर्ट फिल्म मधील कथानक एका गीतामध्ये व काही संवादातून उलगडत गेले आहे व यातील हे गीत लेखिकेने लिहिले आहे. संगीतकार पुजा देशपांडे यांनी या अनुबंधला संगीत देवून गायक मयूर महाजन समवेत या गीताला आपला आवाजही दिला आहे.
अनुबंध या शॉट फिल्मचे निर्माते संजय पैठणकर, एका बँकेत मोठ्या हुद्दयावर कार्यरत आहेत. कलेची आवड शांत बसू देत नव्हती. नोकरी सांभाळत मिरायकलमध्ये बेसिक कोर्स पूर्ण केला आहे. संजय पैठणकर यांनी सांगितले की, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही शॉर्ट फिल्म बनवली होती. पितृस्त्रोत ही परितोषिक कथा वाचण्यात आली होती. यावर फीचर फिल्म बनविण्याचे सल्ले दिले होते. पण मी काही वेगळे प्रयोग करून अनुबंध ही शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. हा वेगळा विषय आहे. या शॉर्ट फिल्म मध्ये मानवी भाव – भावनांची सुंदर गुंफण पाहवयास मिळेल. त्यातही आधुनिक काळात वयात आलेल्या मुलींनी परपुरुषापासून स्वसंरक्षण कसे करावे,याचा विचार मांडला आहे. तसेच घर आणि नोकरी याच्या विळख्यात अडकलेली आधुनिक स्त्री पारंपरिक सण विसरू पहातेय याची जाणीव करून देणारे चित्रण यात आहे.
अनुबंध या शॉर्ट फिल्म मध्ये निशांत देसले, अदिति बोहरा, स्नेहल जाधव, निवेदिता सावेकर, विजय पैठणकर, वृंदा पैठणकर, संजय पैठणकर, उर्मिला वारळकर यांच्या सोबत बेबी आलिया या बालकलाकाराची ही महत्वाची भूमिका आहेत. कॅमेरामन हितेंद्र दांडेकर, संकलन सौजन्य कदम, पार्श्वसंगीत वैभव दुराटकर, निर्मिती प्रमुख अमोल परब व तांत्रिक सोपस्कारमध्ये दिलीप प्रधान अनुभवी दिग्दर्शकाकडून संजयजींना मोलाचे सहकार्य मिळाले. लवकरच अनुबंध शॉर्ट फिल्म यू ट्यूब चॅनेलवर रसिकांना पाहायला मिळेल.