Corona Effect : अभिनेता सिद्धार्थ जाधव बनला कॅमेरामन, हा घ्या पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:07 PM2020-03-24T15:07:50+5:302020-03-24T15:24:16+5:30
सिद्धार्थने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.
देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १०३ वर जाऊन पोहोचली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. सामन्य जनतेसह सेलिब्रेटीनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर स्वत:चे जेवण करतानाचे, पुस्तक वाचतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील तिच्या घरातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सिद्धार्थच्या दोन मुली आणि पत्नी तृप्ती घरातच बॅडमिंटन खेळताना दिसतायेत. हा व्हिडीओ स्वत: सिद्धार्थनेच शूट केला आहे. कॅमेऱ्याच्या मागून त्याचा आवाज येतोय. मुलींना आणि पत्नीला तो सगळ्यांना घरात राहण्याच आव्हान करायला सांगतोय. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने संपूर्ण भारताला घरात सेफ राहा असे आव्हान केले आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांना व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ प्रमाणे अनेक सेलिब्रेटींनी लोकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता कोरोनाचा मुंबईत आणखी एक बळी गेला आहे. 65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती 15 मार्चला यूएईवरून प्रवास करून अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ती व्यक्ती मुंबईत आली, त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. रुग्ण गंभीर असल्याकारणानं उपचारादरम्यान 23 मार्चच्या संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.