जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी सकाळी 6 लाख 63 हजार 541 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. तर 30, 873 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादमरम्यान 1 लाख 42 हजार 175 रुग्ण ठीक झाले आहेत. युरोपात मृतांचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. अशांमध्ये सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे. गोरेगाव येथील बिंबिसार नगर हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या परिसरात कोरोनाबाधित एक रूग्ण आढळल्याच्या माहिती समोर येत आहे. अधिक खबरदारी म्हणून हा परिसर बंद करण्यात आला आहे.
अतिशय कडक बंदोबस्त या परिसरात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बिबिंसार नगर येथे सर्वात जास्त मराठी कलाकार राहतात. मुळात ज्येष्ट कलाकार जयवंत वाडकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी परदेशातून परतलेल्या नागरिकांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुबई आणि स्विज्झर्लंडमधून आलेल्या दोन महिल्या आढळल्या होत्या. मुळात त्या महिलांनी हवीतशी खबरदारी घेतली नाही. कसलीच परवा न करता त्या तशाच बाहेर फिरताना आढळल्या आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच संपूर्ण परिसरात आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
अजूनही लोकांना कोरोनाचे भय नसल्यामुळे ते बिनधास्त असेच फिरताना पाहायला मिळातात. स्वतःची नाहीतर इतरांचा तरी विचार करा. हात जोडून विनंती करत बाहेर न पडण्याच आवाहन जयवंत वाडकर यांनी केले आहे. घरातच बसा आणि सुरक्षित राहा असे सांगत आता प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत चालली आहे अशातही काही महारथींना मात्र अजूनही याचे गांभिर्य नसल्यामुळे सारेच चिंतीत असल्याचे पाहायला मिळत आहे.