कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग हादरले आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढतो आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 500 वर पोहोचली आहे. अशात कोरोनाचा प्रार्दूभाव थांबवण्यासाठी लोकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोक जुमानत नाही म्हटल्यावर काल महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब या राज्यांत संचारबंदी लागू करण्यात आलीय. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारचे आदेश पाळून घरात राहणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. पण सगळे काही ठप्प झाल्याने कष्टक-यांचे मात्र हाल आहे, याचीही चिंता आहेच. धुरळा या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या सद्यस्थिीत भाष्य करणारी हृदस्पर्शी कविता लिहिली आहे.तुझं बाबा बरं हाय... असे शीर्षक असललेल्या या कवितेतून नाक्यावर फुलं विकणा-या एका महिलेची व्यथा मांडली आहे.
तुझं बाबा बरं हाय! नाक्यावरची फुलवाली म्हणाली...तुझं बाबा बरं हाय...८ दिस घरी बसला तरी हातापायी पाचशे शंभराची नोट हाय...मी रोज हितं आली...पन् आठ दिसानंतर आत्ता माझ्या हातावरती पाच जनांचं पोट हाय...अशा आशयाची ही कविता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.
कोरोनासारख्या छुप्या शत्रूशी चार हात करताना माणुसकी हरवू देऊ नका, असेच मार्मिक आवाहन एकप्रकारे त्यांच्या कवितेतून करण्यात आले आहे. आपल्यापैकी सगळेच यातून बोध घेतील,हीच अपेक्षा ...