अख्खे जग कोरोनामुळे अक्षरश: थांबले आहे. लोक आपआपल्या घरात बंद आहेत. रस्ते, बाजारपेठा सगळे ओस पडले आहेत. कोरोनाची दहशत इतकी की, कधी नव्हे ती कधीही न थांबणारी मुंबई सुद्धा जागच्या जागी थांबली आहे. पण थांबले नाहीत ते केवळ कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणारे जिगरबाज रक्षक. होय, या संकटाच्या घडीला देशवासियांसाठी खपणारे, त्यांच्या सुरक्षेसाठी झटणारे, कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जीवांना जीवदान देण्यासाठी अहोरात्र झटणारे काही जण आपल्या अवती भवती आहेत. हेच खरे रिअल हिरो.
मराठमोळा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वेचे वडील असेच एक रिअल हिरो. होय, वडील हे नामांकित सर्जन आहेत. हार्ट स्पेशालिस्टही आहेत. सध्याच्या परिस्थितीत आपल्या संपूर्ण स्टाफसाठी ते डबा घेऊन गेले होते. नचिकेतने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित, घरातल्या या ‘रिअल हिरो’ची स्टोरी शेअर केली आहे.
‘माझे आईवडिल दोघेही डॉक्टऱ माझी बहिण, तिचा नवरा हेही डॉक्टर. कोरोनामुळे अख्खे जग थांबले असताना हे लोक काम करत आहेत. अगदी अहोरात्र जागून लोकांची, रूग्णांची काळजी घेत आहेत. रूग्णालयातील रूग्ण, संपूर्ण स्टाफला घरून जेवणाचे डबे पाठवले जात आहेत. माझ्या मते, हीच खरी सेवा़ मला आठवते, 2005 मधील पूर, दंगलीच्यावेळीही माझ्या डॉक्टर आईने घरून डबे पुरवले होते,’ असे त्याने लिहिले आहे.
नचिकेत हा एक सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. मुंबईच्या लॅक्मे फॅशन वीकमधील जेन नेक्स्ट शोमध्ये त्याच्या नावाचे फॅशन लेबल लॉन्च केले गेले होते.