देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १०३ वर जाऊन पोहोचली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. सामन्य जनतेसह सेलिब्रेटीनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर स्वत:चे जेवण करतानाचे, पुस्तक वाचतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याची छोटी लेक म्हणजेच इरा जाधवने कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे, हे सांगत सर्वांना नम्र आवाहन केले आहे. तिचा हा व्हिडिओ सिद्धार्थने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून सिद्धार्थने लिहिले की, इरा जाधव...मराठीतून कळत नाही.. इंग्लिशमधून सांगू? मग बघा... एक नम्र आवाहन. प्लीज स्वतःची काळजी घ्या.