Join us

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् हातात हिरवा चुडा; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा साज चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:24 IST

Prarthana Behere : प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून कधीच पाहिले नाही. प्रार्थनाचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसते आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, कानात झुमका आणि हातात हिरवा चुडा घातला आहे. ती राणी माझ्या मळ्यामंदी या गाण्यावर हावभाव करताना दिसते आहे. पारंपारिक साजमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहते या व्हिडीओवर तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत. 

प्रार्थना बेहरे शेवटची बाई गं सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर आता ती चिकी चिकी बुबूम बुम सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्याशिवाय स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे,  चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरेस्वप्निल जोशी