दबंग मुक्ताचा रावडी अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2016 11:53 AM
मुक्ता बर्वे हे नाव ऐकताच एक ...
मुक्ता बर्वे हे नाव ऐकताच एक व्हर्सटाईल अॅक्ट्रेस डोळ््यासमोर येते. मुंबई-पुणे-मुंबई मधील चुलबुली मुक्ता असो किंवा जोगवा मधील एकदमच वेगळ््या रुपात समोर आलेली मुक्ता असो. तिच्या दर्जेदार अभिनयावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात एवढे मात्र नक्की. कोणत्याही प्रकारचा रोल अगदी सहजरीत्या, सशक्तपणे साकारणारी ही मराठीतील दबंग गर्ल आता गणवेश या सिनेमात पोलिस अधिकाºयाची भुमिका करताना एकदम हटके रावडी अॅक्शनसीन्स मध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सीएनएक्सशी मुक्ताने साधलेला हा संवाद..... गणवेशमध्ये तु वेगळ््या प्रकारचा रोल करीत आहेस, हा चित्रपट स्वीकारण्यामागील तुझी भुमिका काय ?-: जसे तुम्ही म्हणालात की मी या चित्रपटात वेगळा रोल करीत आहे. तेच मुख्य कारण आहे मी हा चित्रपट स्वीकारण्यामागील. जेव्हा मी या चित्रपटाची कथा वाचली तेव्हाच मला माझी भुमिका फार आवडली. या सिनेमाचा कंटेन्ट खुप छान आहे. एक वेगळ््या प्रकारची भुमिका मला यामध्ये साकारण्याची संधी मिळाल्याने मी हॅपी आहे. या चित्रपटातील तुझ्या भुमिकेविषयी काय सांगशील ?-: या चित्रपटात मी एका महिला पोलिस अधिकाºयाची भुमिका करीत आहे. परंतू ती व्यक्तीरेखा पाहताना तुम्हाला कुठेच फेक असे काही दिसणार नाही. पडद्यावर ती पोलिस अधिकारी पाहताना प्रेक्षकांना ह्युमन लेवलला जाऊन पाहताना खरा पोलिसच दिसेल एवढी परफेक्ट भुमिका करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पोलिस अधिकाºयाची भुमिका जिवंत करण्यासाठी काही पोलिस अधिकारी महिलांना भेटलीस का ? -: हो, मी अन माझा डिरेक्टर अतुल जगदाळे आम्ही या रोलचा अभ्यास करण्यासाठी अनेक पोलिस अधिकारी महिलांना भेटलो होतो. मला शुटिंग सुरु होण्यापुर्वीच एक स्टडी म्हणुन अतुल वेगवेगळ््या पोलिस चौकीतील महिला पोलिसांना भेटवत असे. त्या महिलांच्या काही अडचणी आहेत का, त्यांचे प्रॉब्लेम्स त्या कशाप्रकारे हॅन्डेल करतात या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांच्यावर काही सरकारी नियमांची बंधने असतात का हे जाणुन घेतले. एवढेच नाही तर त्यांचे वैयक्तीक आयुष्य अन काम यांची त्या कशी सांगड घालतात हे सर्व जेव्हा आम्ही जवळून पाहिले तेव्हा ही भुमिका करणे माझ्यासाठी सोपे गेले. तु पहिल्यांदाच या चित्रपटात अॅक्शनसीन्स करताना दिसणार आहेस, यासाठी काही खास प्रशिक्षण घेतले होतेस का ?-: हो मी पहिल्यादांच आॅनस्क्रीन अॅक्शनसीन्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. परंतू यासाठी मी काही खास प्रशिक्षण वगेरे घेतलेले नाही. डायरेक्ट शुटिंगच्या ठिकाणी गेल्यावरच आम्ही सीन्स सुरु करायचो. यामध्ये बºयाच जणांना मी मारताना दिसणार आहे. बरीच पळापळ अन पाठलाग करताना मला जोरदार धावावे लागले आहे. गन चालवावी लागली आहे. या सर्व गोष्टी करताना खरच मजा आली. सेन्सॉरबोर्ड विषयी सध्या खुप चर्चा सुरु आहे, सेन्सॉरशिप बद्दल तु काय सांगशील ? -: सेन्सॉर बोर्ड नक्की काय सेन्सॉर करतायत हे महत्वाचे आहे. नियम काय अन कोणते आहेत हा खरा मुद्दा आहे. प्रत्येकालाच व्यक्त होण्याचा हक्क आहे. आजची जनरेशन इंटरनेट अन युट्युबवर त्यांना हव्या त्या गोष्टी पाहु शकतात. म्हणुन जर चित्रपटांसाठी काही कॅटेगरीज केल्या तर प्रेक्षक त्यांना हवे ते सिनेमे पाहु शकतील. बॉलीवुडमध्ये जाण्याची तुझी इच्छा आहे का ?-: हो नक्कीच मी एखाद्या बॉलीवुड चित्रपटात दिसु शकेन, परंतू त्यासाठी चांगल्या कथेची गरज आहे. एखादा ताकदीचा रोल आल्याशिवाय मी हिंदी चित्रपट करणार नाही. मराठीमध्ये चांगला कंटेन्ट आहे, वेगळ््या विषयाचे सिनेमे येत आहेत अन त्या माध्यामातून आज आम्ही जगभर पोहचतोय. त्यामुळे उगाचच हिंदी मध्ये कोणताही रोल करण्यापेक्षा चांगल्या भुमिकेची मी वाट पाहीन.