Join us

दमलेल्या बाबाची कहाणी मधली बालकलाकार आता दिसते फारच ग्लॅमरस, पाहा Latest Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:33 IST

दमलेल्या बाबाची कहाणी गाणेही प्रचंड गाजले होते. गाण्यावरून सिनेमा बनलवण्याची कल्पना साकारण्यात आली होती. संदीप खरे, दीप्ती भागवत ह्यांसोबत बालकलाकार श्रेया पासलकर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.

'दमलेल्या बाबाची कहाणी' हा सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला होता. सिनेमाने देखील रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. हा सिनेमा रसिकांना भावला आणि सिनेमातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. समाजाच्या ह्या मानसिकते विरुद्ध, एका मुलीचा हळुवार मनाचा बाबा कसं तोंड देतो आणि हे करत असतांनाच, आपलं आणि आपल्या मुलीमधील हळुवार नातंही तो कसं जपत असतो हे अतिशय सुंदररित्या सिनेमातू रसिकांना पाहायला मिळाले होते.

दमलेल्या बाबाची कहाणी गाणेही प्रचंड गाजले होते. गाण्यावरून सिनेमा बनलवण्याची कल्पना साकारण्यात आली होती. संदीप खरे, दीप्ती भागवत ह्यांसोबत बालकलाकार श्रेया पासलकर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. सिनेमात संदीपने साकारलेला दमलेला बाबा आणि मुलीचा अभिनय इतका सुंदर झाला होता की, बाबा आणि मुलीमधील नात्याचं वास्तववादी चित्रण सिनेमात पाहायला मिळाले होते. 

श्रेयाने साकारलेल्या भूमिकेनेही रसिकांची विशेष पसंती मिळवली होती. अतुल कुलकर्णी यांच्यासोबतही जाहीरातीमध्ये ती झळकली होती. श्रेया आता फार मोठी झाली आहे. काळानुसार तिच्या लूकमध्येही प्रचंड बदल झाला आहे. या सिनेमामुळे श्रेयाला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली.

 

मात्र आता हीच श्रेया करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.अभिनयसोबातच श्रेयाला गायनाचीही प्रचंड आवड आहे. तिने गायनाचे अनेक स्टेज शोज देखील केले आहेत.