Join us

सबसे कातील गौतमी पाटीलच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 'घुंगरु' मधून येतीये चाहत्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:14 IST

गौतमीचा सिनेमा म्हणलं की तो हिट होणारच अशा प्रतिक्रिया सिनेमाच्या टीझरवर येत आहेत. टीझर बघितलात का?

Gautami Patil : सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे 'सबसे कातील गौतमी पाटील'. गौतमी अचानकच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. तिच्या नृत्याने तरुणांना भुरळ घातली असतानाच आता गौतमीच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून तर चाहते आणखीच खूश झालेत.

"एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?" गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

गौतमीचा सिनेमा म्हणलं की तो हिट होणारच अशा प्रतिक्रिया सिनेमाच्या टीझरवर येत आहेत. गौतमी आगामी 'घुंगरु' या सिनेमात दिसत आहे. बाबा गायकवाड यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 'घुंगरु'चे चित्रीकरण महाराष्ट्रासह परराज्यातही झालं आहे. यामध्ये गौतमी मुख्य भूमिकेत आहे. टीझरमधून ही प्रेमकथा असल्याचं दिसून येत आहे.

चित्रपटाविषयी गौतमी म्हणाली, 'हा कलाकारांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. त्यामुळे सगळ्यांना नक्कीच आवडेल.' सिनेमात गौतमीची लव्हस्टोरीही दाखवण्यात आली आहे. हा गौतमीचा पहिलाच सिनेमा असून ती अतिशय उत्सुक आहे. या माध्यमातून गौतमीचं स्वप्नच साकार झालं आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एखाद्या अभिनेत्रीपेक्षा गौतमी पाटीलचीच चर्चा जास्त होताना दिसतीये. तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक हजेरी लावतात. गौतमीचा कार्यक्रम म्हणलं की राडा तर होणारच. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना तेवढीच पोलिस सुरक्षा असते. अनेकदा तिचा कार्यक्रम रद्द करण्याचीही वेळ आली आहे. सिनेमाचा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.

टॅग्स :गौतमी पाटीलसोशल व्हायरलमराठी अभिनेतामराठी चित्रपट