Join us

युथ दिनानिमित्त तरुणांना नवचैतन्य व प्रेरणा देणारा “डॉ. तात्या लहाने”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 3:54 AM

“डॉ. तात्या लहाने | अंगार” चा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत चाललाय !!! १२ जानेवारी ला प्रदर्शित झालेला कथा संघर्षाची... ...

“डॉ. तात्या लहाने | अंगार” चा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत चाललाय !!! १२ जानेवारी ला प्रदर्शित झालेला कथा संघर्षाची... जिद्दीची...प्रेमाची...त्यागाची , या  डॉ.  तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित  चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रतात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिक्षणाचे महत्व व संघर्ष या चित्रपटातून यशस्वीपणे मांडण्यात आले आहे.आईची निस्वार्थ भावना, त्याग यातूनच कितीतरी महान समाजवंताचा जन्म झाला ज्यांनी मानवतेला व समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य केले. त्यातील एक म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. त्यांच्या आईने म्हणजे सौ. अंजनाबाई लहाने यांनी तात्यारावांना आपल्या एका किडनीचे दान देऊन त्यांना दुसऱ्यांदा जन्म दिला व मुलाने देखील हा जन्म सत्कारणी लावला व लाखो दृष्टीहीन लोकांना दृष्टी दिली आणी अजूनही गोर गरिबांची सेवा करण्याचे  कार्य सुरूच आहे.डॉ. तात्या लहाने सारख्या थोर व्यक्ती वर चित्रपट काढणे म्हणजे निर्माता/दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या साठी हिमालय पार करण्यासारखे आवाहन होते आणि चार वर्षाच्या परिश्रमाने ते साकार झाले.संपूर्ण महाराष्ट्रभर १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सिनेमा प्रदर्शित झाला. आणि महाराष्ट्रातील सर्वच शहरांत उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यत: विद्यार्थी वर्गाचा कल चित्रपट गृहात उमळून आला. समीक्षकांच्या मते निर्माता / दिग्दर्शक विराग मधुमालती यांनी चित्रपटात जीव टाकला आहे व काही छोट्या गोष्टी वगळता चित्रपट अव्वल दर्जाचा आहे असा समीक्षकांचा कल आहे. महत्वाची बाब सांगायची तर चित्रपट बघतांना कुठेही आढळून येत नाही दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट असावा. डॉ. तात्याराव लहाने यांच्या महान कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी, खडतर आयुष्यातून यशाची गुरुकिल्ली मिळावी व आईच्या त्यागाचा आणि अवयव दानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या प्रामाणिक हेतूने या चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे.