थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय! दे धक्का २ च्या रिलिजची तारीख ठरली, १ जानेवारी २०२२ रोजी होणार प्रदर्शित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:32 PM2021-09-29T22:32:49+5:302021-09-29T22:41:06+5:30

De Dhakka 2 : दे धक्का २ चित्रपट येत्या १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते अमेय खोपकर यांनी दे धक्का २ च्या रिलिजची तारीख जाहीर केली आहे.

De Dhakka 2 is set to release on January 1, 2022 | थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय! दे धक्का २ च्या रिलिजची तारीख ठरली, १ जानेवारी २०२२ रोजी होणार प्रदर्शित 

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय! दे धक्का २ च्या रिलिजची तारीख ठरली, १ जानेवारी २०२२ रोजी होणार प्रदर्शित 

googlenewsNext

मुंबई - सुमारे १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या या विनोदी चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून, त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. (De Dhakka 2 is set to release on January 1, 2022)

दे धक्का २ चित्रपट येत्या १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते अमेय खोपकर यांनी दे धक्का २ च्या रिलिजची तारीख जाहीर केली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणाले की, दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ चित्रपटाच्या रिलिजची तारीख ठरली. १ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दरम्यान, आपल्या ट्विटच्या अखेरीस अमेय खोपकर यांनी थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय असा संदेशही दिला आहे. 

दे धक्का चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार या चित्रपटातही दिसणार

आहेत. तसेच या चित्रपटामध्ये हे कलाकार इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत.
 

यापूर्वी दे धक्का चित्रपटानेही मराठी प्रेक्षकवर्गाच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होते. त्या चित्रपटातील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनावर कायमचे कोरले गेले होते. त्यामुळे आता दे धक्का २ च्या माध्यमातून हे कलाकार विनोदाचा कसा धक्का देतात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असेल. 

Web Title: De Dhakka 2 is set to release on January 1, 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.