Join us

दीप्तीने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 07:15 IST

दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखीस चांगलाच भावतो.

दीप्तीने नुकताच मरुन रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केले आहे. मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते. दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री दीप्ती  सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती.

टॅग्स :दीप्ती सती