रूपेरी पडद्यावर 'पिप्सी' मांडणार अल्लड मैत्रीची परिभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:31 PM2018-07-25T17:31:36+5:302018-07-25T17:31:42+5:30

'पिप्सी' सिनेमात 'चानी' च्या मदतीला प्रत्येकवेळी धावत जाणारा 'बाळू', अश्याच एका जिवलग बालमित्रांचे प्रतिबिंब प्रेक्षकांसमोर मांडतो. त्यामुळेच तर 'बालपण देगा देवा' असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा हा सिनेमा ठरणार आहे.   

Definition of Friendship, 'Pipsy' will be presented on the silver screen | रूपेरी पडद्यावर 'पिप्सी' मांडणार अल्लड मैत्रीची परिभाषा

रूपेरी पडद्यावर 'पिप्सी' मांडणार अल्लड मैत्रीची परिभाषा

googlenewsNext

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला 'पिप्सीसिनेमा, आजपासून संपूर्ण महाराष्ट्रालाबालपणाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित हा सिनेमा प्रेक्षकांना, 'चानीआणि 'बाळूयांच्या निरागस मैत्रीची अल्लड सफर घडवून आणणार आहे. बालपणीच्या निस्वार्थ मैत्रीचे महत्व मोठे झाल्यावरच कळून येते. कोणताही लोभ किंवा अपेक्षा न ठेवतामित्रासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असलेले मित्र बालपणीच लाभतात. 'पिप्सीसिनेमात 'चानीच्या मदतीला प्रत्येकवेळी धावत जाणारा 'बाळू', अश्याच एका जिवलग बालमित्रांचे प्रतिबिंब प्रेक्षकांसमोर मांडतो. त्यामुळेच तर 'बालपण देगा देवाअसे म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा हा सिनेमा ठरणार आहे.   

लहान मुलांचे भावविश्व आणि वास्तविकतेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन'पिप्सीसिनेमात आपल्याला पहायला मिळणार आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शितया सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठीमैथिलीलायंदाच्या ५५ व्याराज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराने सन्मानित करण्यात आले आहेसौरभ भावे लिखित 'पिप्सीया सिनेमातसमाजातील घडामोडीचा दोन लहानग्या मित्रांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे.ग्रामीण भागातील दोन लहान मुलांची कथा या सिनेमात आहेत. आपल्या आजारी आईचा जीव एका माश्यात आहेअश्या समजातून मित्र 'बाळू'च्या मदतीने एका माश्याच्या शोधात असलेली 'चानीया सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आशयसमृद्ध कथानक आणि सर्जनशील मांडणी असलेला 'पिप्सीहा सिनेमा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये झळकला असूनयांमध्ये त्याने आपली विशेष छाप पाडली आहे. यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये'पिप्सी'  सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच. २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.इ. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आणि नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येदेखील 'पिप्सीचित्रपट झळकला आहे. इतकेच नव्हे तरगतवर्षीच्या मामी हाफ तिकीट सेक्शनमध्ये आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या बाल आणि तरुण विभागातदेखील ‘पिप्सी’ सिनेमाची खास स्क्रीनिंग झाली होती. अश्याप्रकारे विविध चित्रपट महोत्सवामधून मैत्रीच्या नात्याची परिभाषा जगासमोर मांडणारा ‘पिप्सी’ सिनेमाआता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील आपलेसे करण्यास येत आहे.

'पिप्सीया सिनेमाच्या नावावरून अनेक चर्चा होताना दिसून येत आहे. सिनेमातील 'चानीआणि 'बाळू'च्या गावातले हे आवडते शीतपेय असूनत्यांचा मासादेखील या 'पिप्सीसारखाच काळा आणि गोड असल्याकारणामुळेया दोघांनी त्या माश्याचे नाव 'पिप्सीठेवले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शिवायया सिनेमाचे टॅगलाईनदेखील 'अ बॉटल फूल ऑफ हॉपअसे असल्यामुळे, 'चानीआणि 'बाळूच्या आयुष्यातली 'पिप्सी'ची ही बाटली कोणती आशा निर्माण करतेहे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Web Title: Definition of Friendship, 'Pipsy' will be presented on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.