Join us

'कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची', अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 4:27 PM

सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

देशभरात बुधवारी राम नवमी साजरी करण्यात आली. यावेळी अमृता यांनी त्यांच्या 'हे राम' या गाण्याचा एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. पण नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोले केलं. एका युजरनं लिहलं,  'हे राम !! आताच झोपेतून उठले होते, आता परत झोपते'. तर आणखी एका युजरनं लिहलं, 'कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची'. तर एका नेटकऱ्यानं 'मामींना OSCAR देण्यात यावा' असं म्हटलं. तर आणखी एकानं 'तुमचं गाणं ऐकून प्रभू श्रीराम पुन्हा वनवासाला जातील', अशी कमेंट केली. 

अमृता यांनी 'हे राम' हे खास गाणं राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावेळी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह गायलं होतं.  अमृता फडणवीस गाण्यांमुळे कायम चर्चेत असतात. गाणी गाणं, त्यांचं सादरीकरण करणं; हे त्यांचे हौसेचे विषय आहेत. यापूर्वी त्यांच्या अनेक गाण्यांवरुन त्यांना ट्रोल केलं केलं. तरीही त्यांनी गाणं सोडलं नाही. अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र,गायनाची प्रचंड आवड असल्यानं  त्यांचे अनेक म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसकैलाश खेरसेलिब्रिटीसोशल मीडियाराम नवमी