Join us

पश्चात्ताप की प्रायश्चित्त? महेश मांजरेकरांची भूमिका असलेल्या 'देवमाणूस' सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:52 IST

महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे यांची भूमिका असलेल्या 'देवमाणूस' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (devmanus, mahesh manjrekar)

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'देवमाणूस' चित्रपटाचं पहिलं पोस्टर भेटीला आलं. या पोस्टरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची फौज दिसली. आता नुकताच 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा आहेत. कसा आहे 'देवमाणूस'चा टीझर?

'देवमाणूस'चा टीझर रिलीज

'देवमाणूस'च्या टीझरमध्ये पाहायला मिळतं की, महेश मांजरेकर वारकऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत रेणुका शहाणे दिसत आहेत. तर पोलीस इन्सपेक्टरच्या भूमिकेत सुबोध भावे आहे. सिनेमात दिसतं की, महेश मांजरेकर यांच्या कुटुंबावर काहीतरी संकट आलेलं असतं. या संकटावर मार्ग काढण्यासाठी महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे कसा तोडगा काढतात, या कहाणीची झलक 'देवमाणूस'च्या टीझरमध्ये पाहायला मिळतेय.

बॉलिवूड प्रॉडक्शन हाउसची निर्मिती

बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध सिनेमांची निर्मिती करणाऱ्या लव फिल्म्सने 'देवमाणूस' निमित्ताने त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर ह्यांना कधीही न पाहिलेल्या वारकरीच्या भूमिकेत 'देवमाणूस'मध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. देवमाणूसचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटासह प्रदर्शित केला जाणार आहे. देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल

टॅग्स :महेश मांजरेकर सुबोध भावे रेणुका शहाणेमराठी अभिनेतामराठी चित्रपट