Join us

रुपेरी पडद्यावर फुलेना ‘शक्ती’च्या भक्तीचा मळा; तंत्रज्ञानाच्या युगात हरवले देवींचे सिनेमे!!

By संजय घावरे | Published: September 25, 2022 1:08 PM

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री असणाऱ्या देवींच्या शक्तीपीठांनी रुपेरी पडद्याच्या माध्यमातूनही आपली महती सर्वदूर पोहोचवली आहे, पण मागील काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर फुलणारा देवींच्या भक्तीचा मळा काहीसा ओस पडला आहे....

 देवादिकांच्या चित्रपटांची वैभवशाली परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री असणाऱ्या देवींच्या शक्तीपीठांनी रुपेरी पडद्याच्या माध्यमातूनही आपली महती सर्वदूर पोहोचवली आहे, पण मागील काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर फुलणारा देवींच्या भक्तीचा मळा काहीसा ओस पडला आहे.

पूर्वी घटस्थापना आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर देवींवर आधारित नवनवीन चित्रपट प्रदर्शित केले जायचे. या चित्रपटांनी सिनेमागृहांपासून, यात्रा-जत्रा आणि टुरींग टॉकिजच्या माध्यमातून भरघोस व्यवसाय केल्याचीही बरीच उदाहरणे आहेत. अलिकडच्या काळात मात्र देवींवर चित्रपट बनणे बंद झाले आहे. चित्रपटांची जागा मालिकांनी घेतली आहे. मोठ्या पडद्यावर गायले जाणारे देवीचे गोडवे छोट्या पडद्यावर मात्र मोठ्या भक्तीभावाने गायले जात आहेत. २०१० पर्यंत महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री वसलेल्या देवींवर सिनेमे बनत होते. त्यानंतर मराठी सिनेमांचा ट्रेंडच बदलल्याने हळूहळू देवादिकांवर सिनेमे बनवणे बंद झाले. याचा परिणाम विशेषत: ग्रामीण भागांमधील सिनेमांच्या व्यवसायावर झाला. पूर्वी असलेल्या १५० टुरींग टॉकिजनी देवींवरील सिनेमांना मोठा आधार दिला होता. टुरिंग टॉकिजमध्येही देवादिकांवरील सिनेमे तूफान व्यवसाय करायचे.

आता टुरिंग टॉकिजची संख्या २०-२५वर आली आहे. यात्रा आणि जत्रा आजही होत असल्या तरी त्यांचे स्वरूप बदलले आहे. निर्मात्यांच्या दृष्टीकोनातून पूर्वी देवादिकांच्या चित्रपटांवर तांत्रिक सोपस्कार करणे कमी खर्चाचे होते, पण आता आधुनिक पद्धतीतील व्हिएफएक्स करणे महाग झाले आहे. अशी बरीच कारणे देवींवर आधारित चित्रपट बनणे बंद होण्यामागे असल्याचे चित्रपट व्यवसायतज्ज्ञ मानतात. अंबाबाई, तुळजाभवानी, एकवीरा, मळगंगा, काळूबाई, सप्तश्रृंगी या देवींवरी चित्रपटांवर मनापासून प्रेम करणाऱ्या, चित्रपटगृहांमध्ये हळदी-कुंकवाचा करंडा घेऊन जाणाऱ्या, पडद्यावर देवीचे दर्शन घडल्यावर हात जोडणाऱ्या प्रेक्षकांना आज मालिकांमध्ये देवींचे दर्शन घडत आहे. ही आहेत कारणे...प्रेक्षकांची आवड-निवड बदलली आहेआर्थिक गणिते बदलल्याने बजेट वाढलेदेवींवरील मालिकांचे प्रमाण वाढलेसिनेमांच्या रिकव्हरीची गॅरेंटी नाहीव्हिएफएक्सवरील खर्च परवडणारा नाहीकॅसेट-सीडीजद्वारे होणारे उत्पन्न बंद झाले 

देवींवरील गाजलेले चित्रपट...कुलस्वामिनी अंबाबाईकाळुबाईच्या नावानं चांगभलंकाळुबाई पावली नवसालाजोगवा अंबाबाईचाआई तुळजाभवानीमायक्कादेवीच्या नावानं चांगभलंकुंडमाऊली मळगंगाएकवीरा पावली नवसालासप्तश्रृंगी माऊली नवसाला पावली

 चित्रपट बनवणे परवडत नाही...लोकांच्या मनात आजही देवीची भक्ती आहे, पण चित्रपट बनवणे परवडत नसल्याने मी आता शेती करतोय. आज देवीवरील सिरीयल्स चालत आहेत, देवींवर सिनेमे बनणे बंद झाल्याची खंत आहे. सर्वच गोष्टी महागल्या आहेत. तंत्रज्ञानावर खर्च वाढला असला तरी चित्रपट कमी वेळेत होऊ लागला आहे. २००४मध्ये ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’नं पाच-दहा रुपयांच्या तिकिटांमध्ये चार कोटी बिझनेस केला होता. श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको असा मेसेजही दिला होता.- अरुण कचरे (निर्माते) आता  तसे होत नाही...मी केलेला ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’ हा चित्रपट रसिकांना आपल्या मातीतला वाटल्याने तुफान चालला. सुरुवातीला मी देखील देवीच्या छोट्याशा भूमिकेत काम करायला कचरत होते, पण देवीचा आशीर्वाद लाभला आणि नायिकेपेक्षा काळुबाईचा रोल गाजला. आज काळानुरूप प्रेक्षकांची चॉईसही बदलली आहे. पूर्वी देवीवरील श्रद्धेपोटी निर्माते देवींची महती सांगणारे चित्रपट बनवायचे. आता मात्र तसे होत नाही.- अलका कुबल (अभिनेत्री, निर्मात्या)

टॅग्स :सिनेमामराठी अभिनेता