Join us

नंदिता वहिनीचा हा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला?, धनश्री काडगावकरने सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 08:00 IST

धनश्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत धनश्रीचा ग्लॅमरस आणि तितकाच मॉडर्न अंदाज पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देधनश्री 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नंदिता वहिनी ही व्यक्तीरेखा साकारत आहे.धनश्रीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. धनश्रीची नंदिता वहिनी ही खडूस भूमिकाही रसिकांना भावते.

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नंदिता वहिनी ही व्यक्तीरेखा साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. धनश्री सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच धनश्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत धनश्रीचा ग्लॅमरस आणि तितकाच मॉडर्न अंदाज पाहायला मिळत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत धनश्रीने केस मोकळे सोडले आहेत आणि तिने परिधान केलेला ड्रेसही तितकाच आकर्षक असा आहे.

 धनश्रीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. तसंच या फोटोवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्सकडून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.  धनश्री साकारत असलेली  नंदिता वहिनी ही खडूस भूमिकाही रसिकांना भावते. या भूमिकेमुळे धनश्रीच्या रिअल लाइफमध्ये अनेक गंमतीदार किस्सेही घडले आहेत. नुकतंच ती एका मॉलमध्ये गेली होती.

त्यावेळी तिथे एका आजीबाईंनी सगळ्या कलाकारांसोबत फोटो काढले. मात्र धनश्रीसोबत फोटो काढण्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, या खडूस बाईबरोबर फोटो काढायचा नाही. ही प्रतिक्रिया आपल्या भूमिकेवरील असून त्या भूमिकेला न्याय देत असल्याचे या आजीबाईंच्या प्रतिक्रियामुळे कळल्याचे धनश्रीने सांगितलं.

 तसंच या मालिकेच्या सेटवर एक चिमुकली आली होती. त्यावेळी मालिकेतील सनीने नंदिताबद्दल विचारलं असता ती चंदे चंदे असं ओरडत निघून गेली. ही प्रतिक्रिया आपल्या भूमिकेला मिळालेली कॉम्प्लिमेंट असल्याचे धनश्रीने सांगितले.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला