Join us  

ध्यानीमनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 5:23 PM

महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांचीही जोडी ध्यानीमनी या आगामी मराठी चित्रपटासाठी जमली आहे. म्हणून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना बºयाच दिवसांपासून लागून होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक पाहाता यावी म्हणूनच या चित्रपटाचा नुकताच सोशलमीडियावर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांचीही जोडी ध्यानीमनी या आगामी मराठी चित्रपटासाठी जमली आहे. म्हणून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना बºयाच दिवासांपासून लागून होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक पाहाता यावी म्हणूनच या चित्रपटाचा नुकताच सोशलमीडियावर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेलर कमी कालावधीतच प्रचंड लाइक्स मिळताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. ध्यानीमनी या चित्रपटाची निमिर्ती देखील महेश मांजरेकर यांनीच केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे आहेत तर अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अश्विनी भावे, तसेच मृण्मयी देशपांडे आणि अभिजीत खांडकेकर हे या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री अश्विनी भावे या बºयाच वर्षांनंतर रुपेरी पडदयावर पुनरागमन करणार आहेत. सध्या त्या अमेरिकेमध्ये स्थायिक असतात. यापूर्वी या अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तिने प्रत्येक चित्रपटामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतू अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ती फारशी प्रेक्षकांना  चित्रपटांमध्ये दिसलीच नाही. एक मोठा ब्रेक अश्विनीने घेतल्यानंतर ध्यानीमनी या चित्रपटातून ती पुन्हा एकदा अभिनय करण्यास सज्ज झाली आहे. तर महेश मांजरेकर अभिनेत्या सोबतच दिग्दर्शक देखील आहेत. प्रेक्षकांनी  महेश मांजरेकर यांच्या अनेक चित्रपटांना पसंती दर्शवीली आहे. नटसम्राट या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. सध्या ते एफयु या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व़्यस्त आहेत. या चित्रपटाची तर प्रदर्शनावूर्वीच चर्चा रंगली आहे. सर्वांचा लाडका परशा म्हणजेच आकाश ठोसर या चित्रपटात एका हटके भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे.