Join us

मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी आहे अभिनेत्री पल्लवी वैद्य, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 7:00 AM

अभिनेत्री पल्लवी तिचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री पल्लवी वैद्यविषयी सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीबाबत सांगणार आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि तिच्या पतीची. पल्लवी तिचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. 

पल्लवीच्या पतीचं नावं केदार वैद्य आहे. केदार एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत. माझ्या नव-याची बायको, माझे पती सौभाग्यवती, झिपऱ्या या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटात त्यांनी सह- दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केले.

पल्लवीने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले होते. आता ती ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेत छोट्याशा भूमिकेत आहे.

पल्लवीला याआधीही अनेक मालिकांमध्ये तुम्ही बघितले असेलच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत तिने पुतळा मातोश्रींची भूमिका साकारली होती. अनेक मराठी चित्रपटांतही ती झळकली आहे. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

टॅग्स :टिव्ही कलाकार