Join us

तुम्हाला माहितीये का, अशोक सराफ यांनी ट्रेनमध्ये ब्लँकेटखाली चेहरा लपवून केला होता प्रवास?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 6:00 AM

Ashok Saraf: विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकतीने मनोरंजनाच्या पडद्यावर रंगवल्या आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ (Ashok Saraf) हे एक मराठी सुपरस्टार आहेत. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे जे आजही आदराने घेतले जाते. अनेक तरुण कलाकारांचे ते आदर्श आहेत.  विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकतीने मनोरंजनाच्या पडद्यावर रंगवल्या आहे. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्यांच्या या कारकीर्दीत त्यांचे असंख्य भन्नाट किस्से आहेत. त्यातीलच एक किस्सा आहे 'पांडू हवालदार' चित्रपटादरम्यानचा.

 'पांडू हवालदार' या चित्रपटात काम केल्यानंतर अशोक सराफ त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरला जात होते. अशोक सराफ महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते, तिथे दोन पोलिसांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे आयुष्य अभिनेत्यापेक्षा चांगले असल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडवली. या घटनेमुळे अशोक सराफ नाराज झाले आणि उर्वरित प्रवासात त्यांनी ब्लँकेटखाली आपला चेहरा लपवला होता.

दादा कोंडके यांची भूमिका असलेला पांडू हवालदार हा चित्रपट आला आणि तीन तासाच्या या चित्रपटातून अशोक सराफ यांना खूप लोकप्रियता मिळाली. आजही तो चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट मानला जातो.

अशी ही बनवा बनवी, गंमत जंमत, नवरा माझा नवसाचा, चौकट राजा असे शेकडो हिट चित्रपट अशोक सराफ यांनी दिले आहेत. बॉलिवूडमध्येही अशोक सराफ हे नाव आदराने घेतले जाते.  हिंदी सिनेइंडस्ट्रीत राकेश रोशन यांच्या १९९५ च्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट करण अर्जुन मधील कॉमिक मुंशीजी, येस बॉसमध्ये शाहरुख खानच्या मित्राच्या भूमिकेत आणि सिंघममध्ये अजय देवगणचा सहकारी म्हणून हेड कॉन्स्टेबलच्या भूमिकेतून अशोक सराफ यांनी रसिकांच्या मनावर चांगलीच छाप उमटविली आहे.

टॅग्स :अशोक सराफ