सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोया. फोटोत बाबांच्या मांडीवर बसलेली ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुक्ताचे वडिल टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरीला होते आणि आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. मुक्ताच्या कुटुंबियातील कोणाचाच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. पण मुक्ताला मात्र अभिनेत्री व्हायचे होते.
शालेय जीवनात अनेक नाटकात काम केल्यानंतर दहावी झाले आणि पूर्णवेळ अभिनय करायचा निर्णय मुक्ताने घेतला.. तिने पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने ललित कला केंद्रात अभिनयाचे धडे गिरवले.
थिएटर या विषयात पदवी आणि ‘ड्रामा’ या विषयातून तिने बॅचलर डिग्री मिळवल्यानंतर मुक्ताने पूर्णवेळ अभिनयाला वाहून घेतले. मुक्ता पुणे सोडून मुंबईमध्ये गर्ल्स हॉस्टेलला येऊन राहिली. 1999 साली ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले.
तिचे पहिले नाटक होते ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’. घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली.
2002 मध्ये मुक्ताला पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमाचे नाव होते ‘चकवा’. पहिल्या चित्रपटानंतर मुक्ताने कधीच मागे वळून पाहिले नाही. थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई - 2, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले. नुकताच मुक्ताचा 'वाय' हा सिनेमा रिलीज झाला आहे.