१४ नोव्हेंबर बालदिन... सर्वांचा आवडता दिवस. आपण कितीही मोठे झालो तरी या दिवशी लहान होऊन हा दिवस साजरा करण्याची इच्छा होतेच. आपल्या लहानपणी या दिवशी आपण मोठ्यांकडून विशेष लाड पुरवून घेतलेले असतात आणि आता मोठे झाल्यावर त्याच गोड क्षणांच्या आठवणीत रमलेलो असतो. अशाच काही सुंदर आठवणी, अंतरंगी किस्से अभिनेत्री रीना मधुकरने शेअर केल्या आहेत.
बालपणीचं टोपण नाव ‘रीनू’ उर्फ आपली रीना हिचे बालपण जितके कम्फर्टेबल होते तितकेच शिस्तबद्ध देखील होते. याविषयी सांगताना रीना म्हणाली, “माझे बाबा एअरफोर्सचे रिटायर्ड ऑफिसर आहेत. एअरफोर्सचे ऑफिसरची जबाबदारी पार पाडताना त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला योग्य अशी शिस्त लावली. गुड मॉर्निंग, गुड नाईट, थँक्यु, सॉरी म्हणायच्या सवयी लावल्या. वेळेची शिस्त पाळायला शिकवली. आई-बाबांनी आम्हांला कधी कशाची कमी भासू दिली नाही, पण हो, आज मागितले की ते लगेच मिळणे ही सवय त्यांनी आम्हांला कधी लावलीच नाही कारण त्यांना आम्हांला स्ट्रगल काय असतो, मेहनत काय असते हे शिकवायचे होते. प्रत्येक गोष्टींची जाणीव करायला शिकवली.”
बालपण मिस करते - रीना“लहानपणी अभ्यास पूर्ण नाही झाला तर टीचर ओरडतील, आवडतं चॉकलेट नाही मिळालं तर? एवढंच काय ते टेन्शन होतं. आणि आता मोठे झाल्यावर किती टेन्शन्स, विचार असतात... मी बालपणातला निरागसपणा, केअरफ्री राहणं आणि कशाचंही टेन्शन न घेणं या गोष्टी जास्त मिस करतेय,” असे रीना म्हणाली.