Join us

वंदना गुप्तेंसोबत असलेल्या 'या' बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:49 IST

Vandana gupte: वंदना गुप्ते सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी शेअर केलेला फोटो चर्चेत आला आहे.

सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतो. त्यामुळेच दूरवर असलेल्या व्यक्तींसोबतही सहज कनेक्ट होता येतं. म्हणूनच, कलाकार मंडळी सुद्धा इन्स्टाग्राम, फेसबूक वा ट्विट यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यात अनेकदा ते त्यांच्या नवनवीन प्रोजेक्ट्सची माहिती देत असतात. तर, काही वेळा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळाही देतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक लहान मुलगा दिसत आहे.

वंदना गुप्ते सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम जुने फोटो वा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यावेळी त्यांनी  एका नाटकातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक लहान मुलगा दिसत असून हा मुलगा आज प्रसिद्ध दिग्दर्शक झाला आबे, इतकंच नाही तर या चिमुकल्याने अनेक बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो ज्याचा त्याचा प्रश्न या नाटकातील असून त्यांच्या सोबत दिसत असलेला लहान मुलगा म्हणजे दिग्दर्शक ओम राऊत आहे. ओम राऊतने बालकलाकार म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

"ज्याचा त्याचा प्रश्न . मी आणि ओम राऊत. बच्चा होता आणि आता मोठा दिग्दर्शक झाला!", असं कॅप्शन देत वंदना गुप्ते यांनी हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, ओम राऊत हे नाव आज बॉलिवूडमध्ये गाजत आहे. 'आदिपुरुष', 'तान्हाजी', 'लोकमान्य: एक युगपुरुष' यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे.

टॅग्स :वंदना गुप्तेबॉलिवूडनाटकसेलिब्रिटी