Join us

मराठी आणि हिंदीतील दिग्गज ६४ गायक आणि कलाकारांचा सहभाग असलेला ‘आकापेला’ तु्म्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 8:40 AM

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट  युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते,अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या एव्हीके एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये गाणे आहे मात्र स्वरवाद्य,तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत,सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठीमधील अजरामर अशा  गाण्यांचे ‘मेडले’ केले आहे. यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव,  स्वप्नील जोशी,सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर,फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी,अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे,सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार,आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर,बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण,आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत.थोडक्यात सांगायचे तर  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळते.अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली असून सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. विनय प्रतापराव देशमुख याची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या व्हिडिओला रुपाली मोघे आणि शाम्प्रद भामरे यांनी संगीत दिले, तर राहुल भातनकर यांनी संकलन आणि निखील गुल्हाने यांनी छायांकन केले आहे.निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल यांनी एव्हीके एंटरटेन्मेंटचे  व्यवसाय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.