अभिनेता विनोद गायकरचा हटके लूक पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 10:35 AM
वेबसिरिज बॅकबेंचर्सच्या निमिताने सर्वाच्या एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक म्हणून भेटीला आला. आतपर्यंत ‘तेरे घर के सामने’ हिंदी नाटक, ...
वेबसिरिज बॅकबेंचर्सच्या निमिताने सर्वाच्या एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक म्हणून भेटीला आला. आतपर्यंत ‘तेरे घर के सामने’ हिंदी नाटक, श्यामची मम्मी, रुस्तम या मधून वेगळी छबी प्रेक्षकापर्यंत पोहोचली आहे. भवन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेला विनोद गायकर युथ फेस्टिवलमध्ये कॉलेजमध्ये नेहमीच मुलांना मदत करण्यासाठी विनोद तत्पर असतो. वयाच्या ४थ्या वर्षी साने गुरुजी कथा माला मधून अभिनयाचे धडे स्वतःहून घेण्यास सुरवात केली. २००१ मध्ये आय. एन.टी चा बेस्ट कॉमेडीयन म्हणून पुरस्कार मिळाला. विनोदच्या आयुष्याचा टर्निंग पॉंईट ठरला ते “तुझ्या आयला’ या अल्फा एकांकीकासाठी स्पर्धेमध्ये बेस्ट ऍक्टर पारितोषिक मिळाले होते. ‘पारिजात’ या सामाजिक संस्थेमधून नेहमीच शाळेतील मुलांना शालेय शिक्षणासाठी, पाठ्यपुस्तकांसाठी लागणारी मदत करणारा विनोद गायकर क्वचितच लोकांना माहित आहे. नुकतेच जागतिक कविता दिना निमित्ताने प्रेक्षकांसाठी मंगेश पाडगावकरांच्या ‘शब्द’ या पुस्तकातील कविता सादर केली. त्याच्या हा काव्य वाचनाचा छोटासा प्रयत्न त्याला फेसबुकवर शेअर केला आहे. दर १५-२० दिवसांनी असा काव्यवाचन करण्याचा प्रयत्न असेल असं विनोद गायकर सांगतात. स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आप-आपल्या कामात असतो. सोशल मिडीयावर वेळ घालविताना त्याला काहीतरी उत्तम प्रतीचे वाचन किंवा एकण्यास मिळावे या हेतून हा एक नवीन प्रयत्न. प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद पहिल्याच काव्य वाचनाला मिळाला आहे.होणार सून मी या घरची या सिरियलमुळे मराठी माणसांच्या मनात विनोद गायकरने घर केले आहे. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या मनावर जादू केली. या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला असला तरी कालाकारांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. शशांक केतकरला ही या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.