Join us

अमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंत का?, लाइमलाइटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:00 IST

अमृता खानविलकरची बहिण लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे. अमृताचा नवरा हिमांशू मल्होत्रादेखील हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आहे. फार कमी लोकांना अमृताच्या बहिणीबद्दल माहित नाही. अमृताला सख्खी बहिण असून तिचे लग्न झाले आहे. तिची बहिण लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बहिणीचे नाव अदिती खानविलकर बक्षी आहे. तिने दीपक बक्षीसोबत लग्न केले आहे. ती एअर हॉस्टेस असून ती दुबईत राहते. अदितीला दोन मुले आहेत निर्वाण आणि नुरवी. अदितीदेखील अमृता इतकीच दिसायला सुंदर आहे. 

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तशीच ती सोशल मीडियावर फॅमिली सोबतचे फोटो शेअर करत असते. अमृता सध्या दुबईला गेली असून तिने तिथले बहिण आणि आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अमृता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृताने राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा या हिंदी चित्रपटात काम केले आहे. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय तिने ‘खतरों के खिलाडी, डान्स इंडिया डान्स, सूर नवा ध्यास नवा’ अशा अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. शेवटची ती 'वेल डन बेबी' चित्रपटात पहायला मिळाली.

टॅग्स :अमृता खानविलकर