Join us

पु.ल.देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:30 IST

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे

ठळक मुद्देपु.ल.देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहेचित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटामध्ये इरावती हर्षेने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. वेगळ्या विषयावरचे, वेगळ्या पठडीतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. त्यासोबतच अनेक बायोपिक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित ... आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम १८ ने केली आहे. या चित्रपटानंतर आता आणखी एक बायोपिक वायकॉम १८ प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व...व्यक्तिचित्रण किती खुश खुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात... हे ज्यांच्या लिखाण शैलीतून कळते...लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो ... हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती ... लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने  महाराष्ट्राचे भूषण होते... ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले... आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे ... म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे ... वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला... या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे... चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. या चित्रपटाचे संगीत अजित परब यांचे आहे.

भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटामध्ये इरावती हर्षेने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या टीझर लाँचच्या सोहळ्यास मराठी एन्टरटेनमेंट वायकॉम18 चे व्यवसाय प्रमुख निखिल साने, अभिनेते महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, शिवाजी साटम, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अभिजित देशपांडे, पूजा सावंत, अंकुश चौधरी, प्रिया बापट इत्यादी उपस्थित होते.

 

टॅग्स :पु. ल. देशपांडे