सिनेमॅटोग्राफर ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास संजय जाधवने केला आहे. ठाण्यात शिकलेल्या संजय जाधवने सुरूवातीच्या काळात काही मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. ‘सावरखेड एक गाव’ हा त्याचा पहिला चित्रपट. तर दिग्दर्शक म्हणून चेकमेट हा पहिला चित्रपट होता. जवळपास ५०हून जास्त चित्रपटात त्याने काम केले आहे. संजय जाधवच्या फॅमिलीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्याची लेक उत्तम डान्सर आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
संजय जाधवच्या लेकीचे नाव आहे ध्रिती जाधव. ती उत्तम डान्सर आहे. ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. तिने काही व्हिडीओ संजय जाधवसोबतही बनवले आहेत. तिच्या डान्सच्या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते.
सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधवने ‘सावरखेड एक गाव’,‘सातच्या आत घरात’,‘डोंबिवली फास्ट’,‘जोगवा’हे मराठी तर ‘मुंबई मेरी जान’,‘सी कंपनी’ हे हिंदी चित्रपट काम केल्यानंतर तो मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी ‘चेकमेट’,‘रिंगा रिंगा’हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले.
मात्र, त्याच्यातील दिग्दर्शक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसमोर आला ते ‘दुनियादारी’ या चित्रपटातून. २०१३ मध्ये ‘दुनियादारी’ हा चित्रपट रिलीज झाला या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप दाद मिळाली.
‘दुनियादारी’च्या निमित्ताने संजय जाधव हे नाव सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले. त्यानंतर संजय जाधवने ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘गुरू’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
‘दुहेरी’ तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांचीही त्यांनी निर्मिती केली. त्यानंतर ‘दुहेरी’ या मालिकेची निर्मिती संजय जाधवने केली.
उत्तम दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरसोबतच तो उत्तम अभिनेतादेखील आहे. ‘सुर सपाटा’या चित्रपटात त्याने अभिनय केला.