दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) लवकरच शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा बराच चर्चेत आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमांत शाहीर साबळेंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) करणार असल्याचा उलगडा झाला आणि अंकुशचा एक खास लुक देखील रिव्हिल करण्यात आला. तेव्हापासूनच या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. आता मात्र या सिनेमाविषयी एक विशेष घोषणा केदार शिंदे यांनी नुकतीच केली आहे. ती म्हणजे केदर शिंदेंची लेक सना शिंदे (Sana Shinde) या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे.
या सिनेमात आणखी एका महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे शाहिरांची पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे'. शाहिर साबळेंच्या पत्नीची ही भूमिका त्यांचीच पणती म्हणजे त्यांची लेक सना साकारणार आहे. नुकतेच लेकीचं या सिनेमातील पहिलं पोस्टर रिलीज करत ही माहिती त्यांनी दिली आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, " आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं....सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'.