मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनावर त्यांनी हे चित्रपट बनवले आहेत. मांजरेकर यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही उल्लेखनीय काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी आतापर्यंत 'वास्तव', 'मुसाफिर', 'जिंदा', 'ओह माय गॉड' आणि 'शूट आउट अॅट वडाळा' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश मांजरेकर नेहमी त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत येत असतात.
महेश मांजरेकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कुणाला ठाऊक नाही. त्यांनी फॅशन डिझाइनर असलेल्या दीपा मेहता यांच्यासोबत पहिले लग्न केले होते. दीपा मेहता यांचा ‘क्वीन ऑफ हर्ट्स इंडिया’ या नावाने डिझायनर साड्यांचा ब्रँड आहे. त्यांच्या साड्यांना मराठी सृष्टीतूनच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांना अश्वामि आणि सत्या ही दोन मुले आहेत. मात्र काही कारणास्तव महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही दोन्ही मुले आज आपल्या आईकडे राहत असली तरी महेश मांजरेकर यांचाही लळा आहे. त्यामुळे बऱ्याचदा ही मुलं महेश मांजरेकर यांच्याकडे राहायला येतात. मेधा मांजरेकर या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी. मेधा सोबत त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे.
मेधा सोबत त्यांचा दुसरा प्रेमविवाह झाला. पहिल्याच नजरेत महेश मांजरेकर यांना मेधा आवडू लागल्या होत्या. महेश मांजरेकर १९९५ साली आई हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. त्यावेळी त्यांची भेट एका तरुणीसोबत झाली. ही तरुणी म्हणजेच त्यांची पत्नी मेधा मांजरेकर. मेधा या दिसायला अतिशय सुंदर होत्या. पहिल्या भेटीतच एक अभिनेत्री म्हणून त्या त्यांना आवडल्या होत्या. तिने आपल्या सिनेमात काम करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर महेश मांजरेकरांनी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधाचा मोबाईल नंबर मागितला.