Join us

अभिनेत्री अक्षया देवधरचा साडीतला फोटो पाहिलात का ?, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:30 IST

मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते.

 अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. अक्षया सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच अक्षयाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षयाने  साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडीत अक्षयाच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांना मोहिनी घालतो आहे. या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे.

अक्षया ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाख परिधान केलेले किंवा सुंदर नोझपिन आणि इतर अनेक छान व वेगळे दागिने घालून फोटो पोस्ट करते. अर्थातच छोट्याश्या दागिन्यामुळेदेखील अक्षयाचे सौंदर्य खुलून दिसते. सुंदर आणि सालस अशा 'पाठक बाईंना' खऱ्या आयुष्यात पारंपारिकपणे तयार होऊन, दागिने घालून नटायची खूप आवड आहे.

टॅग्स :अक्षया देवधर