Join us

प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्यासारखीच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 06:00 IST

Prarthana Behere: प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते आहे. या मालिकेत नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने साकारली आहे. प्रार्थना बेहरेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, फार कमी लोकांना प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नसून ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

प्रार्थना बेहरेला एक सख्खी बहिण असून तिचे नाव गायत्री आहे. तीदेखील प्रार्थनासारखी दिसायला सुंदर आहे. प्रार्थनाने सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर केले आहेत. तिचे तिच्या बहिणीवर खूप प्रेम आहे. गायत्रीच्या वाढदिवसानिमित्त काही वर्षांपूर्वी पोस्ट शेअर करत प्रार्थनाने आभार मानले होते.

या पोस्टमध्ये तिने मी तुझ्याशिवाय माझ्या जगाची कल्पना करू शकत नाही. तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केले आहेस ते मी विसरू शकत नाही, मी तुझी स्वप्ने जगत आहे ताई ... तू माझ्या आयुष्यावर जबरदस्त प्रभाव पाडलास, तू मला प्रोत्साहन दिले आहे. मजबूत व्हा आणि माझ्या मर्यादेपलीकडे जा, तुझ्यामुळे मी एक चांगला माणूस बनू शकले आणि माझे जग कायमचे बदलले आहे...मी देवाचे आभार मानतो की तू माझी बहीण आहेस आणि माझी SOULMATE असल्याबद्दल मी तुझे आभार मानते. प्रार्थनाच्या या पोस्टवरून तिचे बहिणीवर किती प्रेम आहे, हे समजते.

प्रार्थना बेहरेने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी चित्रपटात एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी चित्रपटात काम केलं आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे