केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. यासिनेमा संदर्भातील केदार शिंदेंच्या एक पोस्टने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या दोन विशेष व्यक्तींचे आभार मानले आहेत.
केदार शिंदे यांची पोस्ट अतुल देशपांडे (Sound Recordist) महेश कुडाळकर (Art director).. #baipanbhaarideva मी real location वर शुट केलं आहे. त्यामुळे या दोघांचीही कामगिरी महत्त्वाची होती. जी घरं आम्ही निवडली ती अत्यंत छोटी. कॅमेरा ठेवला तर जागा मिळायची नाही. त्यात फ्रेम मध्ये ६ जणी. पण हे दिव्य कला दिग्दर्शक म्हणून महेशने उत्तम सांभाळलं. खुप आभार. अतुल माझ्या सोबत पहिल्या सिनेमात पासून काम करतोय. त्यामुळे अडीअडचणी आल्यावर मार्ग न सांगता तो काढायचा. ६ जणींचं सिनेमा संपल्यावर डबिंग फार महत्वाचं होतं. त्या भावभावनांचा परीणाम तसाच यायला हवा होता. अतुल ने तिथे सुध्दा चोख भुमिका बजावली. Stay tuned. उद्या शब्दांचा खेळ खेळू.
या पोस्टमधून त्यांनी 'बाईपण भारी देवा'चे साऊंड रेकॉर्डिस्ट अतुल देशपांडे आणि कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांचं आभार मानले आहेत.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत तब्बल २६.१९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई पाहून दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा परब व वंदना गुप्ते या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.