Join us

'मढ्यावरचं लोणी खाणारे हे, कर्म सगळी उत्तरं चोख देणार..'दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ट्विट पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:01 PM

केदार शिंदे यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. मात्र कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएलचा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यातील आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde)  यांनी टीकास्त्र सोडले आहे. केदार यांनी ट्विट करत म्हटले, काय घं# बायोबबल? एवढी खबरदारी घेतली म्हणता तरी, #IPL2021  खेळाडू आलेच ना #coronapositive ?? मढ्यावरचं लोणी खाणारे हे क्रिकेट मंडळ.. कर्म सगळी उत्तरं चोख देणार..

केदार शिंदे यांनी कालही आयपीएलवर जोरदार हल्ला चढवला होता. म्हणायला प्रेक्षक नाहीत, पण म्हणून आयपीएलचा थाट कमी नाही. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी ‘याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे... रणवीर सिंग आणि त्याच्या जाहिरातींच्यामधे दाखवले जाणारे आयपीएलवाले. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरावर...’, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती.

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांच्या अनेक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? असा सवाल अलीकडे त्यांनी विचारला होता. 

टॅग्स :केदार शिंदेआयपीएल २०२३