Join us  

नाटकाला दिग्दर्शकच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 3:18 PM

          रंगभूमीवर सध्या अनेक विविध विषयांवरील नाटक पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटांप्रमाणेच आता नाटकही ...

 
 
        रंगभूमीवर सध्या अनेक विविध विषयांवरील नाटक पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटांप्रमाणेच आता नाटकही सातासमुद्रापार पोहोचली आहेत. आपल्या नाटकांचे विषय आणि कथा दमदार असल्याने प्रेक्षक नाटकांनाही चांगलीच पसंती दशर्वित आहेत. पण नाटक म्हटले कि डोळ्यासमोर लगेच रंगमंच आणि तालमी करणारे कलाकार दिसु लागतात. कोणत्याही नाटकाला योग्य दिशा दयायची असेल तर दिग्दर्शक हा लागतोच. आणि नाटक प्रेक्षकांसमोर निर्विघ्न पार पाडायचे असेल तर त्यासाठी तालमी या करायव्याच लागतात. परंतु रंगभूमीवर सध्या एक असे नाटक येणार आहे ज्याला दिग्दर्शकही नाही आणि त्याच्या तालमी देखील होत नाहीत. वाटले ना आश्चर्य पण नसिम सोलीमॅनपुर लिखित व्हाईट रॅबीट, रेड रॅबीट हे असेच एक अनोखे नाटक रंगमंच गाजविण्यास सज्जा झाले आहे. या नाटकात आपल्याला अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसणार आहे. मुक्ताने आतापर्यंत प्रत्येक नाटकात दर्जेदार भूमिका केल्या आहेत.  सध्या तिची अनेक नाटके रंगभूमी गाजवत आहेत. एवढेच नाही तर मुक्ताच्या प्रोडक्शन हाऊसचे कोडमंत्रा हे नाटक देखील नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरले आहे. व्हाईट रॅबीट, रेड रॅबीट या नाटकात मुक्ताची भूमिका काय आहे हे तरी अजुल समजलेले नाही. परंतु ती नक्कीच आगळ्या-वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसु शकते. या नाटकाचा मराठी अनुवाद सिध्देश पुरकर यांनी केला आहे. लवकरच हे अनोखे नाटक पाहण्याची संधी नाट्यरसिकांना मिळणार आहे.