मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे शुक्रवारी २७ मे रोजी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आईच्या निधनाची बातमी शेअर केली.
रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आईचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती सर्वांना दिली आहे. दिग्दर्शकाच्या आईचे नाव शुभांगिनी जाधव असे आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी जे जे इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये कॉपी रायटर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी २०१०मध्ये नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत मराठी कलाविश्वात पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. रवी जाधव यांनी त्यानंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन केले. लवकरच त्यांचा टाइमपास ३ हा चित्रपट रिलीज होणार आहे.